अमेरिकेने शक्तिपूजनासाठी सर्व केले......?

0 प्रेमाच्याभूतां रचनाकार ZEROCHANNEL

अमेरिकेने शक्तिपूजनासाठी सर्व केले. 


अमेरिकेने शक्तिपूजनासाठी सर्व केले. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर १९४७ च्या मार्चमध्ये अमेरिकेने ब्रिटनला मदत करायची, इटलीला मदत करायची किंवा संपूर्ण युरोपियन राष्ट्रांना मदत करायची याची जी मार्शल योजना आखली होती ती, मला असे वाटते की इतिहासात अशा तऱ्हेची योजनाच झाली नसेल. उलट, एखादे राष्ट्र दुबळे पडले तर इतर राष्ट्रे त्याचे शोषण करतात असा दहा हजार वर्षांचा इतिहास आहे. परंतु एखादे राष्ट्र दुबळे पडले तर दुसरे राष्ट्र त्याला उभे करण्याचा प्रयत्न करते ही एक विशिष्ट गोष्ट आहे. यात भगवद्शक्तीच काम करते. नाहीतर माणसं तर सगळी स्वार्थीच आहेत. अमेरिकेने आठ हजार करोड रुपयांची मार्शल योजना उभी करून ब्रिटन, फ्रांस, इटली वगैरे राष्ट्रांना जेव्हा उभे केले तेव्हा ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान चर्चिल यांनी अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखांना पत्र लिहिले की, 'मी इतिहासाचा अभ्यासक आहे. केवळ कॉलेजच्या History Dept. चा Head नाही तर रणांगणात उभे राहून इतिहास निर्माण करू शकू अशा इतिहासाचा अभ्यासक आहे. आणि म्हणूनच सांगतो की इतिहासात अशी गोष्ट घडलेली नाही की एखादे राष्ट्र जेव्हा दुबळे पडते तेव्हा त्याला दुसरे समर्थ राष्ट्र उभे करते.' त्यावेळी राष्ट्रप्रमुख टूमनने चर्चिलना पत्राचे उत्तर पाठवले की, 'तुम्ही जी प्रशंसा केली त्या प्रशंसेला मी पात्र नाही. आम्ही जे काही केले आहे ते स्वार्थाने केले आहे. तसे तर अमेरिकेला येत्या पन्नास-शंभर वर्षांपर्यंत कोणाची भीति नाही पण व्यक्तिस्वातंत्र्यवादी लोक शक्तिशाली राहावेत यासाठी आम्ही असे केले आहे. 

अमेरिकेजवळ सद्गुण आहेत. सत्प्रवृत्ति बरोबर त्यांनी शक्ति उपासना पण चालू ठेवली. २१ मे ला पॅसिफिक महासागरामध्ये हायड्रोजन बॉम्ब चे प्रक्षेपण झाले. त्यानंतर अनेक ग्रंथ लिहिले गेले त्यात विल्यम लॉरेन्स चा 'Third world war is impossible' नावाचा ग्रंथ वाचण्यासारखा आहे. त्यावेळी अमेरिकेने जे आक्रमण केले तेव्हा रशियाने आत्मघात करायला हवा असे वाटते. अशी शक्ति असेल तरच श्रेष्ठ मूल्यांचे संवर्धन होते. श्रेष्ठ मूल्यांचे संवर्धन कसे होईल? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. त्याचा अभ्यास करण्यासारखा आहे.

आज रशिया शांतीची भाषा बोलते आहे पण त्यांच्या पोटात शांति आहे असे नाही. दहा मिनिटात पृथ्वीवर हाहाकार माजवू शकतील अशी शस्त्रे आज अमेरिकेने चारही दिशेला पेरून ठेवली आहेत. त्यामुळे आज रशिया शांतपणे बसली आहे. ते म्हणतात, 'जगात शांति पाहिजे, समाधान पाहिजे, सर्वांना खायला मिळाले पाहिजे, सगळे जगले पाहिजेत वगैरे. ह्या सगळ्यांच्यामागे जबरदस्त Force (शक्ति) काम करते आहे. तो Force नसता तर ही रशिया शांतीची गोष्ट न करती. मूळ मुद्दा असा की शक्तिपूजा ही मोठ्यातली मोठी गोष्ट आहे. श्रेष्ठ मूल्यांचे संवर्धन कशाप्रकारे होईल ही एक विचार करण्याजोगी गोष्ट आहे. शक्तीच्या उपासने अभावी आपली 'सत्' मूल्ये आणि सिद्धांत रखरखीत वाळवंटाप्रमाणे झाले असते. 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

Galaxy Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable