पोस्ट्स

तु नाहीस…पण मी आहे

इमेज
नाहीस तू… पण मी आहे अजूनही... तुझ्या आठवणींच्या सावलीत मी उभा आहे न सांगता, न ओरडता फक्त सहन करत... तू वळून गेलीस मागे न पाहता मी मात्र थांबलो त्या वळणावर जिथे स्वप्नं तुटली... तु नाहीस म्हणून आकाश कोसळलं नाही पण मनातली शांतता हळूहळू विरून गेली... तु नाहीस… पण मी आहे प्रेमावर विश्वास ठेवणारा तुझ्या अनुपस्थितीतही स्वतःला सावरत उभा राहणारा.... ✍️प्रेमाच्याभूतां    

प्रेमाच्या भूतांनी बदललेली मानसी

रात्रीचे दोन वाजले होते… संपूर्ण शहर झोपेत होते, पण मानसी मात्र गच्चीत बसून चंद्राकडे टक लावून बघत होती. गार वारा केसांतून मोकळा फिरत होता, पण तिच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. हसावं की रडावं, जगावं की मरावं हेच समजत नव्हतं... आठवणींचा भार फार जड असतो… काही दिवसांपूर्वी ती किती आनंदी होती, प्रेमाने भारलेली होती. तिच्या आयुष्यात एक खास व्यक्ती आली होती. तो तिच्यासाठी फक्त प्रियकर नव्हता, तर एक स्वप्न होतं. त्याच्या प्रत्येक बोलण्यात, स्पर्शात, अस्तित्वात तिला एक नवी उर्जा मिळत होती. पण अचानक तो दूर गेला… काही कारण नसताना, कोणताही निरोप न देता... पहिल्या काही दिवसांत तिला वाटलं, तो परत येईल. फोन वाजेल, आणि समोर त्याचं नाव चमकेल. पण नाही… दिवसांमागून दिवस गेले, आठवड्यांवर आठवडे गेले, पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. हळूहळू तिच्या मनात प्रश्न वाढू लागले "खरंच प्रेम असं संपतं का? की तो फक्त एक मोह होता?"... त्या रात्री तिच्या मनात खूप विचारांचं काहूर उठलं होतं. आयुष्य नकोसं वाटत होतं. "प्रेम जर असं वेदना देत असेल, तर त्याचा उपयोग काय?" तिला स्वतःचं अस्तित्वच व्यर्थ वाटू लाग...

पराक्रमी वीर, शत्रूंचा संहारक – शिवराय"

पराक्रमी वीर, शत्रूंचा संहारक  शिवराय" शिवनेरीचा वाघ जागला, न्याय-अन्याय ओळखु लागला स्वराज्याच्या वाटेवरती, शत्रूंचा संहार करू लागला ।।1।। अफजलखान क्रूर तो आला, दगा धोका त्याने सुरु केला प्रतापगडच्या रणांगणी, वाघा सारखा शिवबा गर्जला।।2।। शायिस्तेखान थरथर कापला, लाल महालात जाऊन लपला, तलवारीच्या एका वाराला, बोटं गमावून पळू लागला ।।3।। कारतलब खान चे कपटी ठसे, चक्रव्यूह तो रचत बसे। शिवबांच्या रणकौशल्याने, पराभूत होऊन माघारी जाने ।।4।। औरंग्याने डाव काढले, फितुरीचे जाळे विणले, स्वराज्याच्या स्फुल्लिंगाने, शत्रूंचा अंत घडविला ।।5।। शिवबांचा होता न्याय मोठार, रयतेस दिला मोठा आधार। स्वराज्याचा दीप तेवूनी, इतिहासाला साक्ष घालुनी ।।6।। जय भवानी, जय शिवाजी! -रविंद्र पांडुरंग बनसोडे  अंबड

जिजाऊंचा पुत्र, स्वराज्यस्थापक

 जिजाऊंचा पुत्र, स्वराज्यस्थापक  शिवनेरीच्या गडावरती, एक तारा लखलखला। जिजाऊंच्या संस्काराने, रणसिंह गर्जू लागला।।१।। धाडसाची मूर्ती तो, न्याय-अन्याय जाणणारा। रयतेचा कैवार घेणारा, मावळ्यांचा सखा सारा।।२।। बालपणीच शिकवले, स्वाभिमान अन् शौर्य। मातृभूमीसाठी वाहिले, रक्त, घाम अन् धैर्य।।३।। गनिमांच्या छावण्यांत, भीतीची लाट उठली। स्वराज्य स्थापनेसाठी, तलवारीत वीज चमकली।।४।। गड, किल्ले अन् मावळे, एक नवा इतिहास घडला। शिवरायांच्या तेजाने, स्वराज्याचा दीप पेटला।।५।। आजही हिंदवी सूर्यास, करतो आम्ही मान। जय भवानी, जय शिवाजी, गाजत राहो हे स्वनाम।।६।। रविंद्र बनसोडे अंबड 

गप्प शांतता

 गप्प शांतता जेंव्हा त्रास होतो अंतरी, शब्द थांबतात ओठांवरी, अश्रूही असतात कोरडे, मनातलं सांगू कुणावरी? गप्प राहतो, रडत नाही, सहनशीलतेची हीच तर निशाणी, अश्रूंनी नाही व्यक्त होतं, मनातलं दुःख, त्या शांततेत लपलेलं असतं. संगीत नसलेल्या त्या क्षणी, मनाची चालही थांबलेली असते, वेदनेचा एक गडद सागर, त्या शांततेत साचलेला असतो. हे गप्प राहणं सोपं नसतं, ते वेदनेचा एक हळवा आवाज असतो, तुटलेलं मन, तुटलेलं स्वप्न, त्या शांततेत संजीवनी शोधत असतो. शब्दांच्या पलीकडचं, अश्रूंच्या पलीकडचं, मनातल्या गप्प शांततेचं काय सांगू? हे फक्त तोच जाणतो, जो हसतही वेदना लपवतो. रवींद्र पांडुरंग बनसोडे 

"ऐकटे पणाची चाहूल"

 "ऐकटे पणाची चाहूल" एकांताच्या या क्षणात, गुंफूनी आठवणींचा मोती, मनाच्या सागरात घेतो उडी, तरी उरलो मी एकटा एकांती संगतीचे स्वप्न मिटले, कधीच सुटले ते हाताचे बंध, पाऊले चालत राहिली पुढे, एकाकीचा घेतो मी श्वासांत थंड रोज हसतो जगासमोर, पण आत खोलवर काही विरले, एका चाहुलीत हरवलं मी, वाटेवर चालताना एकटं पडले तरीही या एकांतात, स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो, शांततेत गवसलेली ही साथी, माझ्या अस्तित्वाची नवी ओळख घडवते रविंद्र पांडुरंग बनसोडे 

तुझं हसणं आणि तुझी नजर

 तुझं हसणं आणि तुझी नजर, मनाच्या कोपर्‍यात घेतं थरथर। तू न सांगता सांगतेस खूप काही, तुझ्या शब्दांमध्ये लपलेलं आहे काही तरी। तुझ्या गालावरचा खळीचा थेंब, जणू चांदण्यांचं सौंदर्याचं रूप। तू येतेस जेंव्हा गप्पांच्या ओघात, मन गुंग होतं त्या आनंदात। आवडतात तुझे साधेपणाचे रंग, तुझ्यातच असतो सुखाचा गंध। तू आहेस माझ्यासाठी खास, मनात खोलवर उमटला तुझा प्रकाश। –प्रेमाच्या भूतां