अशीच असते मनाची भाषा...

अशीच ही मनाची भाषा असते
ना पूर्ण बोलकी, ना पूर्ण शांत,
शब्दांआड दडलेली एक हळवी जाणीव,
मौनातूनही अर्थ सांगणारी वाट....

डोळ्यांच्या कोपऱ्यात साठलेली भावना,
श्वासात मिसळलेली अनामिक ओढ,
कळते ती सांगावी लागत नाही,
कारण ती थेट हृदयालाच भिडते....

अशीच ही मनाची भाषा असते
जिथे शब्द थांबतात,
तिथेच नातं सुरू होतं,
हृदयाला हृदयाशी जोडणारी....
✍️प्रेमाच्याभूतां 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट