माझं एक छोटंसं वचन…
माझं एक छोटंसं वचन…
आज मी तुला काही मोठं देण्याचं वचन देत नाही,
ना आकाशातील तारे आणण्याचं स्वप्न दाखवत आहे…
पण एक साधं, खरं आणि मनापासूनचं वचन देतो
परिस्थिती कशीही असो,
तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य जपण्याचा प्रयत्न नेहमी करीन...
तू आनंदात असशील तेव्हा तुझ्यासोबत हसेन,
आणि तू दुःखी असशील तेव्हा तुझ्या बाजूला शांतपणे उभा राहीन...
मी परिपूर्ण नाही,
चुका माझ्याकडूनही होतील…
पण प्रत्येक चूक सुधारण्याची तयारी आणि
तुला कधीच एकटं न सोडण्याची भावना कायम ठेवीन...
वेळ बदलली, परिस्थिती बदलली,
तरी माझा आदर, माझी काळजी आणि माझी साथ
तुझ्यासाठी कायम तशीच राहील....
कारण नातं मोठ्या शब्दांनी नाही,
तर छोट्या-छोट्या प्रामाणिक वचनांनी टिकतं…
आणि माझं हे वचन
तुझ्यासाठी, मनापासून आणि आयुष्यभरासाठी...
@प्रेमाच्याभुता

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा