तु नाहीस…पण मी आहे


नाहीस तू…
पण मी आहे अजूनही...
तुझ्या आठवणींच्या सावलीत
मी उभा आहे
न सांगता, न ओरडता
फक्त सहन करत...
तू वळून गेलीस मागे न पाहता
मी मात्र थांबलो
त्या वळणावर
जिथे स्वप्नं तुटली...
तु नाहीस म्हणून
आकाश कोसळलं नाही
पण मनातली शांतता
हळूहळू विरून गेली...
तु नाहीस…
पण मी आहे
प्रेमावर विश्वास ठेवणारा
तुझ्या अनुपस्थितीतही
स्वतःला सावरत उभा राहणारा....✍️प्रेमाच्याभूतां  

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रेमाच्या भूतांनी बदललेली मानसी

पराक्रमी वीर, शत्रूंचा संहारक – शिवराय"

गप्प शांतता