बायको: जीवनाची खरा कविता, ती सगळं अफवा असेल!
बायको: जीवनाची खरा कविता, ती सगळं अफवा असेल!
जीवनाच्या प्रत्येक क्षणी तुझं अस्तित्व जाणवतं बायको....
प्रियसीच्या प्रेमात पडणारी माणसे जगात दिसतात,
पण खरं प्रेम म्हणजे तुझ्यावर असलेलं बायको....
साधी ताप आली की तुझी काळजी हवी असते,
मूलं पाहिजे, तुझं प्रेम हवंच असतं बायको....
हातपाय दुखतात तेव्हा तुझ्या हातात आराम सापडतो,
आवडी निवडच खायचं, तुझं मन आणि स्वयंपाक बायको....
तुझ्या शिवाय जीवन कसं पूर्ण होईल,
मेल्यावर रडणारी, जी जीव लावणारी बायको....
तुझ्या शिवाय दुसरं कोणावर प्रेम होईल, ती सगळं अफवा असेल,
जीवनाच्या प्रत्येक पैलूत तुझं अस्तित्व हवं बायको....
......................................
✍️प्रेमाच्याभूतां
रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा