हवी होतीस तू….
हवी होतीस तू….
पण तुला मान्य नसेल कदाचित…
गोडी कमी वाटली असेल,
रंगाने, रूपाने सुंदर नसेन मी....
मी सडपातळ, तू गोलमटोल,
मी सावळा, तू गोरी…
तू श्रीमंत, मी गरीब,
तू स्टॅंडर्ड, मी गावढळ....
कसं जमलं असतं आपलं?
तुझ्या-माझ्या बंधात
एका बाजूला प्रेम होतं,
दुसऱ्या बाजूला मैत्री….
एक खरा असेल,
दुसरा खोटा वाटला असेल कदाचित....
मी मनापासून जपलं,
तुला ते ओझं वाटलं असेल....
मी स्वप्न पाहिलं,
तुला ते चूक वाटलं असेल...
म्हणूनच…
या बंधात माघार घेतोय मी.
तुझ्यावर राग नाही,
तक्रार नाही, आरोप नाही…
फक्त एवढंच मान्य केलंय
आपण हवे तसे नव्हतो एकमेकांसाठी....
आणि कधी कधी
सोडून देणं हाच
सर्वात प्रामाणिक निर्णय असतो…
✍️प्रेमाच्याभूतां

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा