तुझ्या माझ्या प्रेमाला काय हवं होतं…
तुझ्या माझ्या प्रेमाला काय हवं होतं…
तुझ्या माझ्या प्रेमाला काय हवं होतं,
हे तुला कधी विचारावंसं वाटलंच नाही….
मी मात्र रोज स्वतःला विचारत राहिलो,
आणि उत्तर देत राहिलो तीच पुरेशी आहे....
त्याला मोठे शब्द नको होते,
ना जगाला सांगितलेली कबुली….
फक्त एकवेळ मनापासून
समजून घे एवढंच मागणं होतं,
पण तेच कुणालाच जमलं नाही....
तुझ्या माझ्या प्रेमाला काय हवं होतं,
हे काळालाही समजलं नाही….
म्हणूनच ते हळूहळू मरत गेलं,
आणि मी जिवंत राहूनही
आठवणींत हरवत गेलो....
आजही लोक विचारतात
तू पुढे का नाही गेलास?
कसं सांगू त्यांना….
जे प्रेमच अर्ध्यावर तुटलं,
ते आयुष्यभर पूर्ण कसं होणार?
@प्रेमाच्याभूता

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा