जिजाऊंचा पुत्र, स्वराज्यस्थापक

 जिजाऊंचा पुत्र, स्वराज्यस्थापक 

शिवनेरीच्या गडावरती,
एक तारा लखलखला।
जिजाऊंच्या संस्काराने,
रणसिंह गर्जू लागला।।१।।

धाडसाची मूर्ती तो,
न्याय-अन्याय जाणणारा।
रयतेचा कैवार घेणारा,
मावळ्यांचा सखा सारा।।२।।

बालपणीच शिकवले,
स्वाभिमान अन् शौर्य।
मातृभूमीसाठी वाहिले,
रक्त, घाम अन् धैर्य।।३।।

गनिमांच्या छावण्यांत,
भीतीची लाट उठली।
स्वराज्य स्थापनेसाठी,
तलवारीत वीज चमकली।।४।।

गड, किल्ले अन् मावळे,
एक नवा इतिहास घडला।
शिवरायांच्या तेजाने,
स्वराज्याचा दीप पेटला।।५।।

आजही हिंदवी सूर्यास,
करतो आम्ही मान।
जय भवानी, जय शिवाजी,
गाजत राहो हे स्वनाम।।६।।

रविंद्र बनसोडे
अंबड 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रेमाच्या भूतांनी बदललेली मानसी

पराक्रमी वीर, शत्रूंचा संहारक – शिवराय"

गप्प शांतता