पराक्रमी वीर, शत्रूंचा संहारक – शिवराय"
पराक्रमी वीर, शत्रूंचा संहारक शिवराय"
शिवनेरीचा वाघ जागला, न्याय-अन्याय ओळखु लागला स्वराज्याच्या वाटेवरती, शत्रूंचा संहार करू लागला ।।1।।
अफजलखान क्रूर तो आला, दगा धोका त्याने सुरु केला प्रतापगडच्या रणांगणी, वाघा सारखा शिवबा गर्जला।।2।।
शायिस्तेखान थरथर कापला, लाल महालात जाऊन लपला, तलवारीच्या एका वाराला, बोटं गमावून पळू लागला ।।3।।
कारतलब खान चे कपटी ठसे, चक्रव्यूह तो रचत बसे। शिवबांच्या रणकौशल्याने, पराभूत होऊन माघारी जाने ।।4।।
औरंग्याने डाव काढले, फितुरीचे जाळे विणले, स्वराज्याच्या स्फुल्लिंगाने, शत्रूंचा अंत घडविला ।।5।।
शिवबांचा होता न्याय मोठार, रयतेस दिला मोठा आधार। स्वराज्याचा दीप तेवूनी, इतिहासाला साक्ष घालुनी ।।6।।
जय भवानी, जय शिवाजी!
-रविंद्र पांडुरंग बनसोडे अंबड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा