गप्प शांतता

0 प्रेमाच्याभूतां रचनाकार ZEROCHANNEL
 गप्प शांतता
जेंव्हा त्रास होतो अंतरी,
शब्द थांबतात ओठांवरी,
अश्रूही असतात कोरडे,
मनातलं सांगू कुणावरी?
गप्प राहतो, रडत नाही,
सहनशीलतेची हीच तर निशाणी,
अश्रूंनी नाही व्यक्त होतं,
मनातलं दुःख, त्या शांततेत लपलेलं असतं.
संगीत नसलेल्या त्या क्षणी,
मनाची चालही थांबलेली असते,
वेदनेचा एक गडद सागर,
त्या शांततेत साचलेला असतो.
हे गप्प राहणं सोपं नसतं,
ते वेदनेचा एक हळवा आवाज असतो,
तुटलेलं मन, तुटलेलं स्वप्न,
त्या शांततेत संजीवनी शोधत असतो.
शब्दांच्या पलीकडचं, अश्रूंच्या पलीकडचं,
मनातल्या गप्प शांततेचं काय सांगू?
हे फक्त तोच जाणतो,
जो हसतही वेदना लपवतो.
रवींद्र पांडुरंग बनसोडे 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

Galaxy Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable