*****जाणिवांची कविता****

 *****जाणिवांची कविता****

तु समोर असुनही,
शब्दांना उणे वाटते,
नजरेत बोलण्याचं सामर्थ्य असलं तरी,
मनाला एकटे पाडते....

मैत्रीचं गाठोडं हळूहळू उलगडतं,
वेळेच्या ओघात सारेच बदलतं.
ज्यांच्या सोबत हसतो-खेळतो,
तेच एकेकाळी दूर होतात....

दादयाच्या, योग्याच्या सोबत,
किती आठवणी मनात घर करतात.
पुस्तकांच्या पानांत उरलेले,
स्मरणांचे तुकडे मात्र हृदयात घर करतात....

कधीकधी ओठांवर हास्य, 
आणि डोळ्यातल्या अश्रूंना कारण देतात,
त्या जुन्या गमती-जमती,
मनात हलकेच घर करतात....

काळ जातो, विसर पडतो,
आणि मित्राच्या अस्तित्वाची जाणीव मिटत जाते.
पण आठवणींनी जपलेलं नातं,
कधीच मनातून संपत नाही....
...
रविंद्र पांडुरंग बनसोडे 
अंबड 
9307220454

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट