वेळेच भान - बोलायचं तर खूप काही होतं

वेळेच भान कोणालाच नाही.....           

                    बोलायचं तर खूप काही होतं,  
पण बोलायला वेळच नाही,  
मनातलं खूप काही सांगायचं होतं,  
पण समोरच्याला मनच नाही.  

आठवण आली मित्राची,  
पण मित्र काही सापडत नाही,  
हे सगळं सोडावं वाटतं,  
पण सुटत काही नाही.  

वेळच नाही आता, काळाचंही भान नाही,  
शेवटी आपणही मुक्क राहावं,  
हे मात्र अजून कळत नाही.  

जीवनाच्या या गुंत्यात,  
कधी थांबायचं, कळत नाही,  
मनातलं सगळं साचतं,  
पण बोलायला वेळच नाही.
.....
रविंद्र पांडुरंग बनसोडे 
अंबड 

टिप्पण्या