आयुष्यातील असंख्य दू:खे..........?

0 प्रेमाच्याभूतां रचनाकार ZEROCHANNEL

आयुष्यातील असंख्य दू:खे,समस्या, अपयश,अपमानानंतर रडत न बसता, देवाला, नशिबाला किंवा इतर कोणालाच दोष न देता आंनदी जीवन जगण्याचा विचार करणे म्हणजे खरी जीवन जगण्याची कला शिकणे. आयुष्यातील अपयशांनी खचून न जाता,धीर सोडून न देता फिनिक्स,पक्षाप्रमाणे भरारी घेण्याचे सामर्थ्य आपल्यामध्येही असतं.


आपल्या जीवनात अनेक अशा घटना घडतात,की आपण अतिशय हतबल होवून जातो अशा वेळी.काय करावे हे सूचत नाही.सूचल तरी लोक काय म्हणतील हा विचार आपल्याला पुढचं पाऊल टाकू देत नाही.आपल्याकडे नकारात्मकतेने बघणारा समाजवर्ग, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक,घरातील व्यक्ती हे सर्व परिपूर्ण आहेत का?आपण त्यांना स्विकारून आयुष्यात पुढे चालताना स्वताला मागे ठेवण्यात आपलं शहाणपण आहे का? कितीतरी प्रसिद्ध, यशस्वी, श्रीमंत लोकांनी आयुष्याच्या अखेरीस एकटेपणा अनुभवला, ज्यांनी आयुष्यभर आपल्या प्रतिष्ठेसाठी लोकांचा, समाजाचा विचार केला.आपण त्यांच्या उदाहरणावरून शहाणे होण्यातच आपलं शहाणपण आहे की प्रत्येक गोष्टीचा स्वतःलाच अनुभव घ्यायचा आणि वेळ निघून गेल्यावर मग शहाणं व्हायच?गुरू ठाकूर यांची खूप सूंदर कविता आहे - असे जगावे दुनियेमध्ये - पाय असावे जमिनीवरती - कवेत अंबर घेताना हसू असावे ओठावरती- काळीज काढून देताना......Feel My Love


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

Galaxy Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable