माझ्या बहिणी...
माझ्या बहिणी...
लहान पणीचे भांडण करून दमलो,
पण जिव मात्र होता, त्यातच एक वेगळं नातं होतं.
शिक्षणामुळं जास्त सहवास नाही भेटला,
जेव्हा भेटलो, तेव्हा तिला तिचा साथीदार मिळाला.
तिचं लग्न झालं, आनंदाने भरून गेलो,
लग्नात आनंदी होतो, पण मनात रडू येत होतं.
मोठा भाऊ म्हणून रडलो नाही,
पण मनाच्या आतमध्ये नक्कीच ओलावला.
आज आठवण आली की, मनात हळवं होतं,
रडतो पण डोळ्यात अश्रू नाही थांबत.
माझी लाडाची बहीण, तायडी, सोनी, राणी, गंगू,
तुला सुखाचं सागर लाभो, हेच माझं वरदान.
तुझ्या स्मिताच्या किरणांत, माझं मन उजळतं,
तुझ्या प्रत्येक सुखात, माझं जीवन फुलतं.
माझ्या बहिणीसाठी, हेच माझं प्रेमाचं गाणं,
तू नेहमीच आनंदी राहा, हेच माझं स्वप्न आहे महान.
..................
लेखक : रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा