**शेवटी मी एकटाच**
तीनं बोलायचं बंद केलं,  
आणि मी एका क्षणी हरवून गेलो,  
किती रडलो, किती तडपलो,  
रात्र रात्र जागून तिला आठवत राहिलो.
स्वप्नांतल्या गाठी, आता उलगडल्या,  
तिच्या शांततेत माझी हाकच विरून गेली,  
तीचं काही घेणं देणं नाही राहिलं,  
पण माझं मन अजूनही तिला शोधतं राहिलं.
आशा आणि आठवणींनी सोबत दिली,  
पण हळूहळू सगळं फिकं होत गेलं,  
शेवटी तीही पुढे निघून गेली,  
आणि मी एका वळणावर एकटाच राहिलो.
शेवटी मी एकटाच,  
त्या रस्त्यावर, त्या क्षणांमध्ये,  
जग जसं पुढे सरकतंय,  
तसंच मीही आता थांबलो,  
शेवटी मी एकटाच...  
पण तिचं स्मरण मात्र अजूनही तसंच आहे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट