"ऐकटे पणाची चाहूल"
"ऐकटे पणाची चाहूल"
एकांताच्या या क्षणात,
गुंफूनी आठवणींचा मोती,
मनाच्या सागरात घेतो उडी,
तरी उरलो मी एकटा एकांती
संगतीचे स्वप्न मिटले,
कधीच सुटले ते हाताचे बंध,
पाऊले चालत राहिली पुढे,
एकाकीचा घेतो मी श्वासांत थंड
रोज हसतो जगासमोर,
पण आत खोलवर काही विरले,
एका चाहुलीत हरवलं मी,
वाटेवर चालताना एकटं पडले
तरीही या एकांतात,
स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो,
शांततेत गवसलेली ही साथी,
माझ्या अस्तित्वाची नवी ओळख घडवते
रविंद्र पांडुरंग बनसोडे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा