निळकंठेश्वर महादेव मंदिर परिसरात दहा हजार वृक्ष लागवडीचा निर्धार

0 प्रेमाच्याभूतां रचनाकार ZEROCHANNEL

अंबड : ब्रह्मांडातील सर्वात सुंदर ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. मनुष्य जाती बरोबरच पशु पक्षी यांना जीवन व्यतीत करण्यासाठी पोषक वातावरण असणारा एकमेव ग्रह. पर्यावरणाची अनुपम देण असणारी आपली वसुंधरा वाढत्या विकास कामामुळे औद्योगिकी करणामुळे,शहरीकरणामुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. खरंतर पर्यावरण रक्षणाची प्रत्येकाची नैतिक जबाबदारी ठरते. आणि याच आदर्श विचाराने अंबड शहरातील पर्यावरण प्रेमी, वृक्ष मित्रांनी एकत्र येत ओसाड झालेला परिसर पुन्हा वनराईने बहरण्यासाठी दहा हजार वृक्ष लागवडीच्या आदर्श उपक्रमास सुरुवात केली आहे.


"वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ।

पक्षी ही सुस्वरे आळविती।" संत तुकारामांच्या या अभंगाचे स्मरण ठेवून भक्तीभाव जपत पर्यावरणाचे रक्षणाचे महत्व विचारात घेऊन वृक्ष लागवडीचा निर्धार केला आहे. अंबड शहरातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असणारे झाडीतील महादेव हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. कधीकाळी हा परिसर वनराईने नटलेला होता. मोठ मोठाल्या वृक्षांनी वेढलेला परिसरामध्ये हे मंदिर असल्यामुळे याला झाडीतील महादेव म्हटले जात असे. परंतु विकास कामामुळे तसेच देखभाली अभावी या परिसरातील वनराईचा संपूर्णतः नायनाट झाला. सर्व परिसर ओसाड बनला. परंतु आता जागृत भक्तांच्या पुढाकाराने निळकंठेश्वर महादेव - मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. आणि भक्ती बरोबरच पर्यावरण रक्षणाची जबाबदारी समजून हा 1 परिसर पुन्हा वनराईने बहरण्यासाठी अंबड शहरातील वृक्ष मित्रांनी पुढाकार घेत आदर्श उपक्रमात सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसात महादेव मंदिर परिसरात पर्यावरण पूरक दहा हजार वृक्षांची 1 लागवड केली जाणार आहे. वृक्षार पण उपक्रमाप्रसंगी भीमराव नाना शिंगाडे, केदार कुलकर्णी, संतोष पेदे संभाजी वराडे, बाबा सोळुंके अंबादास अंभोरे, गणेश झवर, निलेश लोहिया, कल्याण चोथे लक्ष्मण 5 गायकवाड, संतोष ढोबळे, शिवा काळवंडे, बंडू खांडेभराड, भाऊसाहेब खरात, सोमनाथ गायकवाड, पांडुरंग बनसोडे, संतोष पवार, शकर भोजने, राहुल मुंडे, संजय जाधव रामेश्वर पिराने, अर्जुन राऊत, अक्षय शिंगाडे, आदी वृक्ष मित्रांच्या अमूल्य सहकायनि वृक्ष लागवडीचा हा आदर्श उपक्रम राबवला जात आहे. जागृत झाडीतील महादेव मंदिर परिसर पुन्हा वनराईने नटण्यासाठी नावा प्रमाणेच "झाडीतील महादेव" या मूळ रूपात बहरण्यासाठी राबवत असलेल्या तसेच भक्ती बरोबरच पर्यावरण रक्षणाची नैतिक जबाबदारी समजून राबवत असलेल्या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

Galaxy Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable