नेहमी आपलं कौतूक करणारे.................?

0 प्रेमाच्याभूतां रचनाकार ZEROCHANNEL

 आपण नेहमी आपलं कौतूक करणारे, 


आपल्याला सहकार्य करणारे, आपलेपणा' दाखवणारे यांचेच आभार व्यक्त करतो. परंतु आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यास खरे सहकार्य त्या लोकांचे असते जे आपले असून आपल्यासोबत परक्यांसारखे वागतात. ज्यांनी आपल्याला आास दिला, निराश केले,' अर्ध्यावर आपली साथ सोडली, अविश्वास दाखवला त्यांच्यामुळे आपली खरी प्रगती झालेली असते. आपण त्यांच्यावर नाराज होण्यापेक्षा त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच आपण खंबीर, सहनशील होवून जिद्दीने प्रयत्न करतो. माणसाचा स्वभाव असतो, एखादी गोष्ट करू नको किंवा तू करू शकणार नाही असं कोणी आपल्याला आव्हान केलं की ती गोष्ट पूर्ण करून दाखवायची, ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा असतात त्यांनी आपली साथ सोडली की तेव्हाच आपण स्वतःला ओळखायला सुरवात करतो, आपल्या कमतरता, क्षमता आपल्याला दिसायला लागतात आणि आपण जिद्दीने कामाला लागतो. सोपं नसतचं आयुष्य, जेव्हा काळजाला ठेच लागते, तेव्हाच खरं समजते आयुष्य, आणि मग आपण प्रयत्न करतो आपलं आयुष्य सोपं सुखी, यशस्वी बनवण्यासाठी...
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

Galaxy Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable