काळा आहे माझा मित्र.......
काळा आहे माझा मित्र
काळा आहे माझा मित्र
तरीही सुंदर,तरीही चित्तर
रंग त्याचा गडद असे,
आमचा सखाच खरा असे.
काळ्या रंगात आहे जादू,
त्यातच लपली सौदर्याची वाळू,
त्याच्या हसण्याने उजळते जीवन,
त्याच्या प्रेमाने जुळते नाते गाढ..
सूर्यही काळ्या रात्रीत झोपतो,
तारकांचे सोबती घेऊन जागतो,
तसाच माझा मित्र आहे प्रिये,
त्याच्यात आहे तेजाची दिये...
काळा आहे तो तरीही सगळ्यांचा लाडका,
त्याच्या सोबतचे दिवस होतात खूपच गोडका,
रंग त्याचा काळा जरी असे,
त्याच्या अंत:करणात चांदण्याच झगमगणं असे...
माझ्या मित्राला काळा रंग शोभतो,
त्याच्या हृदयाची सुंदरता कधीही न संपतो,
आमंच नात आहे अनमोल रत्न,
काळ्या रंगात भरल सोन्याच वजन....
काळा आहे माझा मित्र - रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा