आठवणीचा शेवटचा निरोप-मनातल्या भावना

0 प्रेमाच्याभूतां रचनाकार ZEROCHANNEL

आठवणीचा शेवटचा निरोप-मनातल्या भावना 
 

अलगद येऊन तुझ्या समोर उभं राहायचं,  
शेवटचं एकदा तुला भेटायचं,  
तुझ्या आठवणींचा भार माझ्या मनावर आहे,  
पण आज त्या सगळ्या तुला वापस द्यायचं. 
 
तुझा हात माझ्या हृदयावर ठेवायचा ,  
त्या धडकांचा आवाज तुला ऐकवायचं,  
प्रत्येक ठोक्यात तुझं नाव आहे,  
आज तेही तुझ्याकडे सुपूर्द करायचं.  

तुझ्या डोळ्यात डोळ घालायचं,  
असंख्य भावना त्या नजरांमध्ये शोधायचं,  
जे अपूर्ण राहिलंय, ते सांगायचं,  
शेवटचं एकदा, सगळं मोकळं करायचं.  

क्षणभर थांबून, त्या क्षणाला पकडायचं,  
आणि मग त्या आठवणींच्या ओझ्यातून मोकळं होऊन,  
शांतपणे पुढं चालायला सुरुवात करायचं,  
शेवटचं एकदा तुला भेटून, कायमचं निरोप द्यायचं.......... 
मनातल्या भावना 
.....
रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड
.....
FEEL MY LOVE 
r_zerochnnel

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

Galaxy Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable