प्रेमाच्या त्या वेदना..

 प्रेमाच्या त्या वेदना..... 

कामाच्या ओझ्यात दबला जीव तुझा,
वेळ मिळाला नाही भेटायला, बोलायला तुला.
माझ्याशी बोलायला जिव तुटला तुझा थोडा थोडा,
हृदयाला तुझ्या लागलेली वेदना, समजतेय मला.

ओढ तुझी लागतेय मनाला, 
पण वेळेच्या ओझ्यात हरवतोय शब्दांचा गंध सारा.
काय सांगू तुला, हृदयाचे हाल, 
विरहाच्या क्षणी मीही तुटतोय दररोज, थोडा थोडा.

काळजाच्या त्या गाभ्यात, तुजसोबतची आठवण आहे,
तुझ्या आठवांच्या सागरात बुडताना, श्वासही थांबतोय जरा.

मनाला वेढणारी तुझी ओढ, 
काळजाला लागलेला घाव, अजूनही ताजा आहे.

विरहाचे ते क्षण, प्रेमाच्या त्या वेदना,
मनात साठवलेत, हे गुपित काही, 
ओढ तुझी अजूनही आहे तीच, 
पण काळजाला दिलास तुजपासूनच घाव, थोडा थोडा...
.....
रविंद्र पांडुरंग बनसोडे 
अंबड
r_zerochannel 
FEEL MY L🥰VE

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट