तुझ्या अंनतात मध्ये विलीन होऊ दे

 **तुझ्या अंनतात मध्ये विलीन होऊ दे**

तुझ्या अंनतात मध्ये विलीन होऊ दे,  
तुझ्या प्रेमाच्या सागरात हरवू दे,  
तुझ्या श्वासांच्या स्पंदनात एकरूप होऊ दे,  
माझं सर्वस्व तुझ्या अस्तित्वात गहाण ठेवू दे..
तुझ्या नजरेत मला माझं जग दिसतं,  
तुझ्या स्पर्शाने माझं मन खुलतं,  
तुझ्या हसण्यात माझ्या दु:खाचं विसर्जन,  
तुझ्या सावलीतच सापडतं जीवनाचं गमक..
तू आहेस माझं प्रेम, माझा प्राण,  
तुझ्या सोबतच आहे माझा सारा प्रवास महान,  
तुझ्या हातात हात देऊन चालायचंय मला,  
तुझ्या प्रत्येक आठवणीत रमायचंय मला..
तुझ्या शब्दांच्या गोडीत हरवू दे मला,  
तुझ्या पावलांच्या वाटेवर चालू दे मला,  
तुझ्या सुख-दुःखात भागीदार होऊ दे,  
तुझ्या अंनतातच कायमचं विलीन होऊ दे..

रविंद्र पांडुरंग बनसोडे 
अंबड 
FEELMYL😍
r_zerochannel

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट