गुलाबी रंगाची नवरात्री

 गुलाबी रंगाची नवरात्री

 

प्रेम, उमेद, आणि सौंदर्याची उर्मी
मातेच्या चरणी हे रंग धरून
भक्तीत रंगते, होऊनी आनंदात मग्न
गुलाबी हे रंग प्रेमाचे प्रतीक 
नवचेतनेने भरतो मनाचा कानाकोपरा
राधेच्या ओढीचे, गोकुळाच्या लहरीचे
मातेच्या चरणांतील गोड प्रेमाचे
मुलींच्या लाडक्या रंगाचा दिवस 
सौंदर्य, नम्रता, आणि मृदुतेचा बहर

दुर्गेच्या रुपात या गुलाबी साज

शक्तीचा, प्रेमाचा, जगाला संदेश
नवरात्रीच्या या उत्सवात, गुलाबी रंग फुलतो
 प्रेमाच्या रंगात भक्त, मातेवर प्रेम करतो
धाग्यात विणलेले हे प्रेम, उमेदीने भरलेले
गुलाबी नवरात्रीचा आनंद, मनाला खूप भावणारे

                रविंद्र पांडुरंग बनसोडे 
                अंबड 
              r_zerochannel


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट