निळा रंग - नवरात्री संग
नवरात्रीत हा रंग, भक्तिचा अधिराज्य टेक
दुर्गेची आराधना, या रंगात निसटते,
त्यातच मातेची शक्ती, प्रेमळ रूपात दिसते
निळा रंग घेऊन येतो, शांततेची छाया,
मनातली अस्वस्थता, विसरायला एक पाया
नऊ रंगांचा सोहळा, प्रत्येक रंगाची वेगळी छटा,
निळ्या रंगात आहे साद, आभाळाच्या अमरत्वाची कथा
या नवरात्रीत घेऊ हा निळा रंग ध्यानी,
दुर्गा माता आशीर्वाद देईल अनंतगुणी
तोच निळा रंग जीवनात शांतीचा प्रवास घेऊन येईल,
नवरात्रीत भक्तिचा दीप प्रज्वलित करील, ज्यात नवा विश्वास मिळेल
रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड
r_zerochannel


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा