लाल रंग नवरात्रीत, उधळतो तेज अन् जोष

0 प्रेमाच्याभूतां रचनाकार ZEROCHANNEL

लाल रंग नवरात्रीत, उधळतो तेज अन् जोष           


लाल रंग नवरात्रीत, उधळतो तेज अन् जोष,
शक्तीचा तो प्रतीक, जणू देवीचा अनमोल कोश
उष्णतेची जाणीव, प्रेमाची धगती आग,
असतो जोशात सजलेला, नवरात्रीत होतो भाग

लाल रंग म्हणतो, उभा रहा सदा शक्तीच्या बाजूस,
त्याच्या जोडीने चालताना, असं तेव्हा वाटतं खास
प्रेम, उमेद आणि धैर्य, त्याचे रंग हे त्रिधारी,
नवरात्रीत, लालच तेव्हा देवीच्या रूपात उभारी

म्हणतो तो, "भीतीचं भुईसपाट करा,
तुमच्यातील देवीला जागृत करा"
लाल रंगातल्या नवरात्रीत, एकता अन् शक्तीचं गान,
तेजस्वी लाल रंगाने भरलेला, हा दसऱ्याचा सण.
रविंद्र पांडुरंग बनसोडे 
अंबड 
r_zerochannel

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

Galaxy Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable