राखाडी रंगाची सावली - नवरात्री पावली
राखाडी रंगाची सावली - नवरात्री पावली
राखाडी रंगाची ही शांत छाया,
मनात ठरवी नवा निवारा
संयमाचा धागा विणला जणू,
शांततेच्या वाटेवर चालु वारा
नवचैतन्याची नवी उमेद,
मनाला देई अनोखी प्रेरणा
राखाडी रंगात अंतरीची जाणीव,
शुद्ध भावनेची असते गरज
आत्मचिंतनाचा नवा मंत्र,
मनाशी धरावी शांतता सारा
राखाडी रंगाची सावली भारी,
नवस्फूर्ती देऊन करील उजाड
राखाडी रंग हा साधेपणाचा,
माय माऊलीचा आशीर्वाद भारी
नवरात्राचे हे दिव्य सण,
राखाडी रंगात होई सजण
रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा