हिरवा रंग - नवरात्रीचे सौंदर्य
नवरात्रीत हिरवा रंग सांगतो,
जीवनाला नवीन सुरुवात देतो
ताजेपणाचं प्रतीक हा,
नवचैतन्याचा उत्सव साजरा
हिरवा रंग निसर्गाचा साथी,
धैर्य आणि शांती घेऊन येतो माथी
द्राक्षाच्या वेलीला दिली फुलांची साथ,
धरतीला नव्याने सजवतो हरितगाथ
मातेला अर्पण ही हिरवी ओटी,
संपूर्ण करतो नवसाच्या वाटी
उत्साहात भरतो, नव्या क्षणांची आस,
नवरात्रीच्या रंगात हिरवा खास
नव्या स्वप्नांना नव्या आशेची जाणीव,
हिरवा रंग देतो शक्तीची अनुभूती स्थिर
धर्माच्या रंगात हा हिरवा रंग,
जीवनाला करतो दिव्य, उगवतो नव्याने संग
रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड
r_zerochannel
अंबड
r_zerochannel

