जगणं म्हणजे सतत प्रवाहात असणं, जस एक नदीचं पाणी कधीही थांबत नाही तसं आपलं जीवन देखील. गेला तो भूतकाळ, तो आता आपल्या हातात नाही. भूतकाळ म्हणजे अनुभवांचा खजिना आहे, परंतु तो पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला तर फक्त हातून सटकून जाणारा वारा आहे. त्याच्यात अडकून पडणं म्हणजे वर्तमानाच्या सौंदर्यातून डोळे मिटून घेणं.

 चला जीवन चालू आहे…

भविष्यकाळाकडे पाहिलं की वाटतं की खूप काही मिळवायचं आहे, खूप मोठं काही घडायचं आहे. पण भविष्यकाळाचा विचार करत करत आपलं वर्तमान हळूच निसटतं. भविष्य म्हणजे फक्त आशा आणि स्वप्नं. पण या क्षणाचा आनंद घेतला नाही तर ती स्वप्नं देखील फोल ठरतील.

मागचं सोडून द्या, आणि पुढचं कसं असणार आहे यावर विचार करत बसू नका. वर्तमानकाळ आपल्याला मिळालेलं सर्वात मोठं बक्षीस आहे. याचं महत्त्व समजून घ्या. प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण याचा आनंद घ्या. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जीवनाचा मोठा अर्थ सापडतो.

जगणं हे भविष्याच्या तयारीसाठी नाही, ते या क्षणात पूर्णत्वाला जाण्यासाठी आहे.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट