पिवळा रंग आणि नवरात्र
पिवळा रंग आणि नवरात्र
पिवळा रंग आज फुलून आला
संपूर्ण जग हे सजून गेलं,
देवीच्या रंगात, आनंद मिसळला
सूर्याची किरणं जशी झळकतात,
तशी देवीची कृपा मनात झुलतात
पिवळं वस्त्र हे शुभ्रतेचं चिन्ह,
समृद्धी, आनंद याची आळवणी सतत
हे रंग नवलाईचा धागा विणतात,
उत्सवाच्या मंगल आरतीतून बोलतात
देवीची आराधना मनोभावे झाली,
पिवळ्या रंगात सुखाची वाट दिसली
रंग हा साधा नाही, शक्तीचा तो आभास,
देवीचा आशीर्वाद, आयुष्यात नवा प्रकाश
नवरात्रीत पिवळा रंग हसतच आला,
आनंद, यश आणि भरभराटीचा झाला
-रविंद्र पांडुरंग बनसोडे
पत्ता: विकास नगर, अंबड
Insta ID: r_zerochannel


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा