तुझ्या गप्पांमध्ये हरवलेले क्षण ...
तुझ्या गप्पांमध्ये हरवलेले क्षण ...
तुझ्या सोबत गप्पा मारता, हरवून जायचो मी,
तू परत कधी बोलशील, या विचारात रमायचो मी
आठवणी तुझ्या मनाच्या, जागवून जातात क्षणभर,
तुझी वाट पाहणं, का होईना, बनलंयं माझं अंतर..
बोलायचं झालं तर, काय बोलावं हेच विचारतो,
तुझी वाणी निघताच, मन माझं गार व्हायचं
ओके, हो, काय सांगू, खरं की खोटं काहीही नाही,
तुझे शब्द बोर झाले, नविन काही ऐकण्याचं राहिलं नाही....
कान माझे उघडे झाले, तुझ्या नवीन गोष्टींसाठी,
कुठल्या शब्दांत सांगू, हे मनाचं गुपित तुला,
तुझी गप्पा, तुझी वाणी, मनातल्या प्रत्येक आठवणीत,
तुझ्याशी बोलण्यातच, हरवलेलं माझं आयुष्य जगू मी पुन्हा...
.......................................
रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड
9307220454

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा