अनमोल भेटीचे क्षण
अनमोल भेटीचे क्षण
तु आज भेटणार
मन आनंदाने नाचणार...डोळे भरून बघणार...
मन मस्त गाणं म्हणणार...
काळीज धडधडणार..
आणि अजून प्रेम वाढणार..
तु जवळ येणार..
आणि लांब जाणार..
या वेळेला घडणारे क्षण कायम ध्यानात राहणार...
हात हातात गुंफणार,
तुझ्या स्पर्शात हरवणार,
प्रत्येक क्षण आठवणीत साठवणार,
आणि मनाला अधिकच भासणार...
तुझ्या हसण्यात हरवून जाणार,
तुझ्या मिठीतून प्रेम मिळणार,
डोळ्यांच्या गाठी, शब्दांच्या भेटी,
आयुष्यभराच्या आठवणींमध्ये रहाणार...
...............
रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड
r_zerochannel
zerochannel.in


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा