पहिले प्रेम
डोळ्याला डोळे भिडले आणि अंगात वीज चमकली...
हे क्षण कधी न अनुभवले आनंदाने मन फुलले...
गप्पा मारताना मन लाजाळू सारखे..
जाताना मात्र मन धगधगले
आज तुला भेटून वातावरण प्रेमळ झाले
तुझ्या आठवणीत मन गुपचूप आहे..
तुझं हास्य पाहून हृदय हर्षाने ओथंबून आहे..
तूच माझ्या जीवनाचा आधार आहेस..
तुझ्या प्रेमात मन सदा हरवून आहे..
..................
रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड

