दोन पाखरांची कथा,....आज दोन पाखर ऐकमेकांचें गाणी
दोन पाखरांची कथा
आज दोन पाखर ऐकमेकांचें गाणी गात होते,
प्रेमाच्या जादूने हरवले होते, त्या रंगीले आकाशात.
भान त्यांना काहीच न उरले,
एकमेकांच्या मिठीत जगले, आकाशाच्या बाहेर.
प्रेमाच्या जादूने हरवले होते, त्या रंगीले आकाशात.
भान त्यांना काहीच न उरले,
एकमेकांच्या मिठीत जगले, आकाशाच्या बाहेर.
जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होते,
नवीन अनुभवांचे रंग घेत होते.
या भेटीचा सोहळा जीवनात कधीच येणार नाही,
पण या क्षणांचे स्मरण जीवनभर राहील कायम.
शेवटी, पाखरांनी आपले रस्ते घेतले,
पण त्या प्रेमाच्या आठवणी त्यांच्याबरोबर सोडून गेली.
त्या एका क्षणाने सजवले जीवनाचे सुर,
आणि आजही मनाच्या गाभ्यात वाजते त्या प्रेमाचे सूर.
.....,.......
आठवणीचा उजाळा
- रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा