हे जीवनात तू आलीस अशी,
हे जीवनात तू आलीस अशी
हे जीवनात तू आलीस अशी,
एक अनोळखी भावना झाली सजीव,
कुठल्याही कामात लागेना मन,
फक्त आणि फक्त तुझंच ध्यान येत.
मनात येते अनेक शब्दांची साखळी,
पण तुला सांगता येत नाही,
माझं मन जाणूनही की तू भेटणार नाहीस,
तुझ्याकडे वळूनच राहतंय हळूहळू.
माझ्या भविष्याची नाही चिंता,
कारण तुझं मन रमलय तुझ्या प्रेमात,
पण मनाची अशीच चालू राहील माया,
तुझ्या आठवणींनी जीवन सुंदरच राहील.
-- रवींद्र पांडुरंग बनसोडे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा