*प्रेम कमी झालंय का?*

0 प्रेमाच्याभूतां रचनाकार ZEROCHANNEL

 *प्रेम कमी झालंय का?*


काय झालंय कळत नाही,  
पण तुझ्यावरचं प्रेम कमी झालंय,  
कधी नव्हतं असं वाटलं,  
पण आताशिक  तुझ्याशिवाय मन शांत झालंय...

कसा झालं हे कळेना,  
पण हळूहळू तुझं अस्तित्व हरवायला लागलंय,  
काळजीतून जे प्रेम उमलायचं,  
ते आता निवळायला लागलंय...

कुठेतरी हरवलंय आपलं गोड हसू,  
आता काहीस शांत विचार होतोय,  
तुझ्या आठवणींनी जी मिठी घातली होती,  
ती आता सैल व्हायला लागलीय...

काय झालंय माहिती नाही,  
पण तुझ्यावरचं प्रेम कमी झालंय,  
कधीचं प्रेमाचं वळण बदललंय,  
आणि आता मन थोडंसं थांबलंय...

परत येईल का ते प्रेम पुन्हा?  
किंवा आपण शोधू काही नवं?  
कसा झाला हा बदल कळत नाही,  
पण तुझ्यावरचं प्रेम कमी झालंय, तुझ्यावरचं प्रेम कमी झालंय...
( हे इतिहासातल ,फक्त सुचले आणि मांडले याचा चालू जीवनाचा काही संबध नाही)
..........................
FEEL MY LOVE 
रविंद्र पांडुरंग बनसोडे 
अंबड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

Galaxy Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable