पांढरीची वारी, पावले चालती,
पंढरीची वारी - पावले चालती
पांढरीची वारी, पावले चालती,
पंढरीच्या वाटेवर, निसर्ग देतो साथ,
पायी चालताना, येते अनोखी मजा,
गात भजन, हरिपाठ, आनंदाचा प्रवास.
देवाचं नाव घेत, सुरू होतो प्रवास,
घरच्या सर्व आठवणी, ठेवून दूर खास,
वारीवर गेल्यावर, येतो आनंद अवीट,
विठ्ठलाच्या चरणी, होते प्रेमाची रीत.
निसर्गाच्या कुशीत, चालतो भक्तांचा मेळा,
वाऱ्याच्या झुळकीत, हरिपाठाचा वेगळा रांगोळा,
पायांना थकवा, पण मनाला मिळते विश्रांती,
विठुरायाच्या दर्शनाने, होते जीवाची शांती.
चिंता विसरून, चालतो भक्तांचा समूह,
भजनाच्या तालावर, नाचतो साऱ्या सृष्टीचा समूह,
वारीचा हा आनंद, अनोखा, अपार,
विठ्ठलाच्या भेटीत, होतो मन उजळ.
वरील वाटेवर, निसर्गाचे दृश्य सुंदर,
आकाशाच्या किणारी, उडतात पक्ष्यांचे थवे सुंदर,
प्रकृतीच्या कुशीत, चालतो भाविकांचा मेळावा,
विठ्ठलाच्या दर्शनाने, होतो मनाचा मेळावा.
वारीचा हा प्रवास, भक्तीचा उत्सव,
विठुरायाच्या दर्शनाने, होते अंतःकरणात नवचैतन्य,
पांढरीची वारी, प्रेमाने भरलेली,
विठ्ठलाच्या पायाशी, भक्तीने नटलेली.
-
रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड
9307220454
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा