अर्धवट बोलणं

 **अर्धवट बोलणं**  


गोष्टी तशाच राहिल्या अर्धवट,  
मनाला लागला भारी त्रास,  
तू आज नाही, काल नाही,  
उघड्या प्रश्नांमध्ये अडकलो खास.

प्रेम व्यक्त करायचं की थांबायचं,  
सागरात उतरणं की किनाऱ्यावर रहायचं,  
दूरच्या गाठीत गुंतलं मन,  
उत्तर शोधायला ठेवलं सगळं.

तुझ्या न बोलण्याचा आळस का कळेना,  
प्रश्नांनी झळ सोसतो आहे,  
प्रेमाच्या गुंतागुंतीत जीव लपवला,  
तुझ्या उत्तराची वाट पाहतो आहे.....
.......
रविंद्र पांडुरंग बनसोडे 
अंबड
.........
🤗

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट