प्रेमाच्या रंगांची कहाणी: एक दिवसाच्या भावनांचा प्रवास
प्रेमाच्या रंगांची कहाणी: एक दिवसाच्या भावनांचा प्रवास
प्रेमाचे ते रंग, अगणित भावनांचे संग,
सकाळी हासवले तिला, गोड शब्दांच्या संग.
क्षणभर परीशान केली, रुसवा-फुगवा खेलला,
तिच्या ह्रदयाच्या कोपऱ्यात दुखाचा झरा पेरला.
नंतर समजावले तिला, हळूवार शब्दांचे नक्षत्र,
माफी मागितली मी, ह्रदयात भरलेलं अंतर.
शिक्षा मागितली तिच्या हातून, प्रेमाची गोड शिक्षा,
नंतर पुन्हा प्रेम केले, ह्रदयातल्या भावनांची परीक्षा.
आणि शेवटी प्रेमाची गाडी, पुन्हा आली रुळावर,
आपल्या नात्याच्या या प्रवासात, आनंदाचा लहरावर.
..................................
रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा