सुकलेलं गुलाब..

सुकलेलं गुलाब


आज पाहिलं गुलाबाचं फुल सुकलेलं, मनात विचार आला, का असं घडलं?  
निसर्गाच्या रम्य वातावरणात,पण तरीही फुल सुकलेलं होतं.

पावसाच्या सरी येऊन राहिल्या,गारव्यातलाही आनंद वाटला, 
मस्त गारव्यात तरीही का,हे सुंदर फुल सुकलेलं होतं.

कदाचित काळाच्या धुंदीत,सुखाने आणि दुःखाने नाचत,  
फुलांनी सुद्धा घेतलं असेल,आपलं मूक उत्तर देत.

जगात कितीही असू आनंद,कधीतरी सुकतं सगळं,  
फुलांचंही असतं असं,जीवनाचं निराळं रंग.

तर माणसा, समजून घे,जीवनाचं हे सत्य,  
फुलासारखा हसून जरा,सामोरं जा दुःखाला.

गुलाबाचं फुल सुकलं असेल,पण त्यातही सौंदर्य आहे,  
सोना आणि चांदीच प्रेम,अजरामर, सदैव टिकणार आहे 
.........................
****रविंद्र पांडुरंग बनसोडे****
**अंबड** 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट