प्रेमाचं दुःख
*प्रेमाचं दुःख*
कोणी कोणावर प्रेम नका करू,
जे हाल होतील ते सहन होणार नाही,
प्रेमाचं जगणं सहज नसतं,
कधीच त्यात समाधान मिळणार नाही.
प्रेम भेटलं तर ते टिकत नाही,
जगण्याच्या प्रत्येक क्षणाला आठवण येईल,
कामाच्या प्रवासात तुमचं मन हरवेल,
स्वप्नांचा संसार पुन्हा कधी दिसणार नाही.
भविष्यावर प्रेम करावं,
तेच खरं साथीदार होईल,
सुखाचा शोध निरर्थक,
दुःखाचं प्रेमच आनंद देईल.
राधा कृष्णाला जे भेटलं नाही,
हिर रांझा, लैला मजनूचे प्रेम,
तेच सत्य, तेच वास्तव,
आणि तेच सर्वांसाठी एकच धर्म.
सुखाची ओढ सगळ्यांना असते,
पण दुःखच खऱ्या प्रेमाचं रूप आहे,
दुःखावर प्रेम करा,
खरं सुख तिथंच दडलेलं आहे.
........................................
*FEEL MY LOVE*
*रविंद्र पांडुरंग बनसोडे, अंबड*


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा